मराठी - Marathi

Aviagen मध्ये आपले स्वागत आहे

Aviagen ब्रॉयलर पैदासकार एका दिवसाचे दोन पिढ्यांचे (आजोबा आणि वडील) कोंबडी पशुधन जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांमधील ग्राहकांना Arbor Acres®, Indian River® आणि Ross® या ब्रँड नावाने पुरवतात. या क्षेत्रामधील अत्यंत नावाजलेल्या आणि सन्माननीय ब्रॅंड्समध्ये यांचा समावेश होतो आणि मोठ्या संख्येने असलेल्या आणि खात्रीदायक ग्राहकांसोबतच यातील प्रत्येकाची यशस्वी वाटचाल आजवरच्या प्रवासात सिद्ध झाली आहे.

Aviagen, विशेष पैदास पशुधन देखील पुरवतात जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या निवडीमध्ये अधिक पर्याय मिळतात आणि बाजाररहाटीच्या विशेष गरजांची पूर्तता करता येते. खास पक्ष्यांचा Rowan Range® ब्रँड, ज्यात नराच्या निवडीवर वेगवेगळे रंग अवलंबून आहेत, तो निवडक क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे आणि तो एक विशेष भाग किंवा उदयोन्मुख बाजाराच्या गरजांची पूर्तता करतो, ज्यामध्ये कमी वेगाने वाढणारे, बंदिस्त नसलेले, आणि सेंद्रिय विभागांचा समावेश होतो. Specialty Male® संग्रह ही नरांची अशी वंशावळ आहे जी अशा ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी बनविण्यात आलेली आहे ज्यांना त्यांच्या ब्रॉयलर पैदास समूहामध्ये काही विशेष कार्यान्वित गुणधर्मांची गरज आहे, ज्यात छातीच्या मांसाची अधिक उत्पादन, अधिक तापमान असलेल्या ठिकाणाशी अनुकूलन किंवा एफसीआर आणि अंड्यांची संख्या यासारख्या प्रत्यक्ष उत्पादन गुणविशेषांची उपस्थिती यांचा समावेश होतो.

Aviagen यांचा यशस्वी आणि सुस्थापित जनुकीय निवड कार्यक्रम सुदृढता आणि सर्वसाधारण आरोग्य यामध्ये सातत्याने सुधारणा करतो आणि सोबत पक्ष्यांना सर्वोच्च पातळीची काळजी आणि आरोग्यास उपकारक मानके उपलब्ध करून देतो

Ross ब्रँड तुमच्या क्षेत्रात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही Aviagen या इंग्रजी साइटला लिंक करू शकता.


Aviagen and Ross logos


माहिती संग्रह

आमच्या माहिती संग्रहामध्ये Aviagen यांनी निर्माण केलेले साहित्य आहे ज्याचा उपयोग आमच्या ग्राहकांना त्यांचा उद्योग नफ्यात चालविण्यास होईल ज्यातून सुयोग्य थवा नियोजन कार्यक्रमाद्वारे उच्च-कार्यक्षमतेच्या कोंबड्यांची पैदास करता येईल.

माहिती संग्रहात शोधण्यासाठी, शोध मॉड्यूल वापरा. आपला शोध अधिक नेमका करण्यासाठी, कीवर्ड शोध आणि मॉड्यूलवरचे ड्रॉप डाऊन मेनू वापरा.

माहिती संग्रहातील माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे, सोबतच महत्त्वाची संसाधने [मराठी] मध्येही उपलब्ध आहेत. पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी, फक्त शीर्षकावर क्लिक करा. [मराठी] आणि इंग्रजीमधील माहिती शोधण्यासाठी माहिती संग्रहातील शोध टूल वापरा

आमच्याशी संपर्क सा

जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर कृपया आमच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा.

Aviagen India
दूरध्वनी: +91 (0)4252 233650
पत्ता: Tamil Nadu
ईमेल: indiasales@aviagen.com
मीडिया: mediainquiries@aviagen.com

माहिती संग्रह शोध

व्यवस्थापन कागदपत्रे